Thane Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार? ठाण्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट

thane municipal corporation opposition leader race: ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेत महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, आता विरोधी पक्षनेतेपदासाठीही स्पर्धा तीव्र झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

विकास काटे, ठाणे, साम टीव्ही

ठाणे महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिंदेसेनेला कौल मिळाला आहे. तर भाजपला त्याखालोखाल जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं महापौरपदाचा पेच वाढला आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांनी ठाण्याचं महापौरपद मिळावं, अशी मागणी केली आहे. तसंच जर महापौरपद, तसेच सत्तेत उचित मान-सन्मान मिळाला नाही तर विरोधात बसू, असा थेट इशारा दिला आहे.

महापौरपदासाठी युतीमधील दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, ठाण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. ही स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी सर्वाधिक संख्याबळ असणं आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्रित येत निवडणुका लढवलेले राष्ट्रवादीचे दोन्ही गट ठाण्यातही एकत्र येऊन विरोधी पक्षनेतेपद मिळवतात का, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com