प्रतिकात्मक बार तयार करून पैसे उधळत ठाकरे गटाचे महायुती सरकारच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन|VIDEO

Mahayuti Government Ministers Criticized: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने महायुती सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. प्रतीकात्मक डान्सबार उभारून पैसे उधळले आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त प्रकरणांचा निषेध नोंदवला.
Summary

ठाकरे गटाचे संपूर्ण राज्यात जनआक्रोश आंदोलन.

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतीकात्मक डान्सबार उभारून आंदोलन.

कार्यकर्त्यांनी पैसे उधळून महायुती सरकारचा निषेध नोंदवला.

डान्सबार प्रकरणामुळे सरकारवर टीकेची झोड उठली.

महायुती सरकामधील काही मंत्री आणि आमदारांच्या वर्तणूकीमुळे गेल्या काही दिवसांपासून सरकार हे चांगलेच अडचणी सापडले आहे. यामुळे विरोधीपक्षासह सामान्य जनतेमध्ये देखील संतापाची लाट पसरली आहे. याचा निषेधार्थ आज ठाकरे गटाच्यावतीने संपूर्ण राज्यात जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे.

भरस्टेजवर प्रतीकात्मक डान्सबार उभारला आणि त्यामध्ये एका पुरुषाने महिलेचे कपडे घालून डान्स केला तर तिच्यावर कार्यकर्त्यांनी पत्ते आणि पैसे उधळून महायुती सरकारचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला होता. आणि हा डान्सबार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानेच होता असे देखील तपासात समोर आले होते, यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यावरूनच ठाकरे गटाने अनोखे आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com