Konkan पदवीधर मतदारसंघातील मविआचा तिढा अखेर सुटला, ठाकरे-पवार गटाच्या उमेदवारांनी घेतली माघार

महाविका आघाडीच्या दोन घटक पक्षातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानपरिषदेतला तिढा संपला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघडीचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाकडून किशोर जैन आणि शरद पवार गटाच्या अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दोन्ही गटाने काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिनही घटक पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरला होता. आता दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आघाडीतला हा तिढा सुटला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतही उपस्थित होते. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना यश मिळणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com