Civic Officer Transfer: ठाकरे बंधूंचा मोर्चा आणि निवडणूक विभागातून 'त्या' अधिकाऱ्याची बदली|VIDEO

Sachin Borse Transferred From Election Department: मनसे आणि ठाकरे गटाच्या संयुक्त मोर्चानंतर ठाणे महानगरपालिकेतील निवडणूक विभागाचे अधिकारी सचिन बोरसे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी सचिन बोरसे यांची निवडणूक विभाग पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

अगदी काही दिवसांपूर्वी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा महापालिकेच्या विरोधात काढण्यात आला होता. दरम्यान आंदोलनापूर्वी शिष्ठमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन बोरसे यांच्याकडून निवडणूक विभाग हे पद काढून घ्यावे अशी मागणी लावून धरली होती या आंदोलनाच्या तीनच दिवसात बोरसेकडून निवडणूक विभाग हे पद काढून घेण्यात आले आहे.

ठाण्यातील अनधिकृत बांधकाम आणि आगामी मतदारयादीतील संभाव्य घोळावरून ठाकरे आणि मनसेच्या मोर्चात बोरसे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आले होते. यानंतर आज ठाणे महापालिका आयुक्तांनी सचिन बोरसे यांच्याकडून निवडणूक विभागाची जबाबदारी काढून घेतली आहे. निवडणूक विभाग त्यांच्याकडून काढून परवाना विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com