VIDEO : विश्वविजेत्या टीम इंडियाला घेऊन जाणारी ओपन डेक बस मरीन ड्राइव्हच्या गर्दीत अडकली!

Team India Victory Celebration : टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत पोहोचले असून, त्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर चाहत्यांनी गर्दी केली आहे. त्या गर्दीत ओपन डेक बस अडकलीय.

Team India Victory Celebration : विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडू मुंबईत पोहोचले आहेत. टी २० वर्ल्डकप ट्रॉफी जिंकून अवघ्या भारतीयांचे स्वप्न १७ वर्षांनंतर पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केली आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर चाहत्यांची जणू लाट आली आहे. उत्साहाला उधाण आलं आहे. लाखोंच्या संख्येने मरीन ड्राइव्हवर गर्दी केली आहे. जगज्जेत्या खेळाडूंची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत ही विजयी मिरवणूक काढली जाईल. पण ज्या ओपन डेक बसमधून टीम इंडियाच्या खेळाडूंची मिरवणूक काढली जाणार आहे, ती बस या चाहत्यांच्या अलोट गर्दीत अडकली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com