Swine Flu : चिंता वाढली! महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा शिरकाव; पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ रुग्ण, VIDEO

Swine Flu Cases Surge in Pimpri Chinchwad : स्वाइन फ्लूनं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड, साम टीव्ही

swine flu cases reported in Pimpri Chinchwad Maharashtra : गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू असतानाच, सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारं वृत्त येऊन धडकलंय. महाराष्ट्रात स्वाइन फ्लूनं शिरकाव केला आहे. पिंपरी - चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ३१ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीत एक, तर जुलैमध्ये पाच रुग्ण आढळले होते. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं आहे.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. २०२२ मध्ये ५८ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यावर्षी ऑगस्टमध्येच ३४ रुग्णांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये १५ रुग्ण आढळले होते. यावर्षी पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. आगामी गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीत जाणं टाळावं, शक्यतो मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत. त्यानंतरही सर्दी, खोकला, ताप आल्यास पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफने यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com