Anjali Damania: धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय घनवटांच्या पत्नीचा मृत्यू संशयास्पद, अंजली दामनियांचा खळबळजनक दावा|VIDEO

Rajendra Ghanwat wife Manali Ghanwat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांना जमिनी हडपल्याचा आरोप असणारे राजेंद्र घनवट याच्या पत्नीचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, हा मृत्यू संशयास्पद असल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, रात्री उशिरा मनाली घनवट यांचा मृत्यू झाल्याचे समजले पण तो मृत्यू नक्कीच नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय दामनिया यांनी केला. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com