Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Surya Dam Main Pipeline Explodes: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विरारच्या खानिवडे हद्दीत सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर तब्बल 30 ते 40 फूट उंच पाण्याचा मोठा फवारा आकाशात उडताना दिसून आला. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी महामार्गावरून वाहून जात वाया गेल्याचे समोर आले आहे. सूर्या धरणाची पाईपलाईन नेमकी कशामुळे फुटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. एकीकडे वसई-विरार शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com