Ram Satpute: 'सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्या' उत्तम जानकरांचा बळी घेऊ नका' राम सातपुतेंचा शरद पवारांना सल्ला

Marakadwadi Election: बॅलेटपेपरवर मतदान घ्या आणि सुप्रियाताईंना राजीनामा द्यायला सांगा असा सल्ला माजी आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांना दिला.
marakadwadi election
Ram Satpute Saam TV
Published On

माजी आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या निवडनुकीच्या मताचा निर्णय आमदार राम सातपुते यांना अमान्य केला आहे. त्यातच सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यांचे खासदारकीचे पद आता काढूण टाका अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी केली. ते पुढे बारामती येथे झालेल्या निवडणुकीवर संताप व्यक्त करत काही महत्वाच्या बाबी म्हणाले.

माजी आमदार राम सातपुते म्हणाले की, 'ईव्हीएमचे भांडे फोडायचे असेल तर पवार साहेबांनी सुप्रिया ताई यांना बारामती येथून राजीनामा द्यायला सांगून मत पत्रिकेवर मतदान घ्यायला सांगा. उत्तम जानकर यांचा बळी देण्यापेक्षा सुप्रिया ताई यांचा राजीनामा घेऊन मत पत्रिकेवर मतदान घ्या' असा छोटा सल्ला माजी आमदार राम सातपुते यांनी आज शरद पवार यांना दिला आहे. तसेच मारकडवाडी गावात देशातील कुठलाही नेता येऊ देत. या सर्व गोष्टींना उतारा म्हणून भाजपकडून येत्या २ दिवसात आमदार गोपीचंद पडळकर यांची मोठी सभा होणार आहे. यामुळे मारकडवाडी येथून आ. गोपीचंद पडळकर हे थेट आता शरद पवार यांच्याशी भिडणार आहेत. अशी ही माहिती त्यांनी सुत्रांना सांगितली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com