Supriya Sule: राजकारण आणि कुटुंब या दोघांमध्ये कोणीही गल्लत करू नये, जय पवारांच्या साखरपुड्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया|VIDEO

Engagement Ceremony: जय पवार आणि ऋतुजा पाटील साखरपुड्यानिमित्त काल सर्व पवार कुटुंब हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावरच राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र जय पवार यांचा काल 10 एप्रिल रोजी पुणे येथील एका फार्महाऊसवर ऋतुजा पाटील यांच्यासोबत साखरपुडा झाला. या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबीय बरेच दिवसांनी एकत्र आले होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे दिसत होते. मात्र जय पवारांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंबामध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. यावरच सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही गोष्टी या परिवारात असल्या पाहिजे राजकारण आणि परिवारात गल्लत कोणी करू नये आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात एक लेक येत आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com