महत्वाचा निर्णय! ऊस गाळप हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून, VIDEO

Maharashtra sugarcane crushing season to start from October 15 2026 : राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हंगाम सुरू करण्याबाबत सरकारकडून साखर कारखान्यांना आवश्यक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

ऊस उपलब्धता, ऊस गाळप नियोजन, साखरेचे उत्पादन, शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर आणि साखर कारखान्यांच्या विविध आर्थिक व तांत्रिक बाबींचा बैठकीत आढावा घेतला. दरम्यान साखर उद्योगाबाबत केंद्राकडे असलेल्या प्रलंबित विषयांवरही चर्चा करण्यात आली. साखर किमान विक्री किंमतीत वाढ, इथेनॉल दरवाढ, इथेनॉल प्रकल्प प्रलंबित व्याज अनुदान तातडीने देणे आदी मागण्यांबाबत केंद्र सरकारकडं शिफारस करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com