VIDEO: Pune महानगरपालिकेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा दारु पार्टी करत धागडधिंगा

Pune Hostel Students News: पुणे महानगरपालिकेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा दारु पार्टी करत धागडधिंगा, वसतिगृहात बेशिस्तपणा वाढत चालल्याचा प्रकार समोर.

पुणे महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांनी दारु पार्टी करत धागडधिंगा केल्याचा प्रकार समोर आला आहे. घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात हा प्रकार समोर आला असून याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे आणि कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतिगृहातील बेशिस्तपणा वाढत असल्याचं दिसत आहे. यामुळे येथील शांत विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकीट, तंबाखूच्या पुड्या सापडल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाने १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com