Gurukul Monitor POCSO Case: भयंकर! विद्यार्थ्याचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल; गुरुकुलात धक्कादायक प्रकार|VIDEO

Student Blackmailing Classmates With Nude Photos: रत्नागिरीतील संत ज्ञानेश्वर माऊली गुरुकुलात अल्पवयीन विद्यार्थ्याने सहाध्यायांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक गंभीर वाद निर्माण झाला आहे. या गुरुकुलातील एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर, जो वर्गाचा मॉनिटर आहे. त्याने इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातच या गुरुकुलाचे प्रमुख ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्यावर विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या प्रकरणी पोक्सोचे (POCSO) दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कोकरे महाराजांना न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराजांवरील पोक्सो प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून ‘रॅगिंग’सारखा हा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकरणामुळे गुरुकुलाच्या कार्यपद्धतीवर आणि प्रशासनावर पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com