Education News: शाळा संपल्यानंतर ‘कोचिंग क्लास’ बंद! शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा|VIDEO

Legal action: शाळेतील शिक्षक उर्वरित वेळेत जर खासगी क्लासेस चालवणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार अससल्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणअधिकाऱ्यांनी दिले आहे.

आता शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना खासगी कोचिंग क्लास जर घेतला तर त्यांना कायदेशीर कारवाईसमोर सामोरे जावे लागणार आहेत असे आदेश नुकतेच शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिले आहेत. अनेक शिक्षक शाळेमध्ये कार्यरत असून पगार पण घेता आणि शाळेच्या वेळेनंतर खासगी शिकवण्या घेतात. परिणामी वर्गात शिकवण्यामध्ये कमी उत्साह दाखवणे व विद्यार्थ्यांना दबाव टाकून आपल्या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये येण्यासाठी भाग पाडणे असे सर्रासपणे शिक्षक हे करत होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कठोर निर्णय घेतला आहे. आता सर्व शाळांमध्ये प्रत्येक शिक्षकाकडून लेखी आश्वासन घेतले जाणार आहे त्यांनी कोणत्याही स्वरूपात खासगी शिकवणी चालवता येणार नाहीये किंवा सहभागी होता येणार नाहीये.

यावर अखिल भारतीय जिवा सेनेने आक्षेप घेत शिक्षणधीकऱ्यांकडे तक्रार केली होती.त्यानुसार आता कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सरकारने शिक्षकांना उत्तम वेतन, भत्ते, सुविधा दिल्या आहेत. मग त्यांना बाहेरशिकवण्याची गरज काय? असे प्रश्न उपस्थित केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com