Satara : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, घटना लपविण्याचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला; शिक्षणाधिकारी लक्ष घालणार का ?

पाेलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके काय झाले हाेते हे उघडकीस येईल असे सांगण्यात आले.
6 students from lodhwade zilla parishad school admitted in dhaiwadi hospital
6 students from lodhwade zilla parishad school admitted in dhaiwadi hospitalSaamTV
Published On

Satara News :

लोधवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (lodhwade zilla parishad school) 6 विद्यार्थ्यांना विषबाधा घटना झाल्याची घटना लपविण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. या सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान पाेलिसांनी या घटनेतील विद्यार्थ्यांकडे चाैकशी करुन कार्यवाही सुरु केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार सातारा जिल्ह्यातील लाेधवडे जिल्हा परिषद शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात खाऊचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना उलटी होण्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना दहिवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

6 students from lodhwade zilla parishad school admitted in dhaiwadi hospital
Sai Mandir विकासासाठी 50 कोटी : सईद खान

ही घटना लपवण्याचा प्रकार सुरू होता. पण काही सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांचे जबाब घ्यायला सुरुवात केली. तेथे पाेलिस आणि काही युवक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. (Maharashtra News)

दरम्यान या विद्यार्थ्यांना नेमकी विषबाधा कशातून झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. पाेलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके काय झाले हाेते हे उघडकीस येईल असे सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

6 students from lodhwade zilla parishad school admitted in dhaiwadi hospital
Solapur ZP CEO दिलीप स्वामी यांची Chhatrapati Sambhajinagar Collector पदी नियुक्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com