Uday Samant News | उदय सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, कारण अस्पष्ट

मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. वाशिम यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी उदय सामंत यवतमाळमध्ये आले होते.

मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. वाशिम यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी उदय सामंत यवतमाळमध्ये आले होते. तेव्हा सामंत यांच्या ताफ्यातल्या एका गाडीवर हा दगड फिरकावण्यात आला. यात हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची काच फुटली. ज्या गाडीवर दगडफेक झाली त्या गाडीत सामंत नव्हते. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालेले नाही. तसेच असा हल्ला नवीन नाही असे म्हणत सामंत यांनी पुण्यात अशीच दगडफेक झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com