ST Fare: ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागणार

ST Corporation : ऐन दिवाळीच्यावेळी ST बसचा प्रवास महागणार आहे.महामंडळाने १० टक्के प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला.

सणासुदीचे दिवस सुरू आहेत, दसऱ्यापासूनच दिवाळीची लगबग सुरू होत असते. दिवाळीच्या सुट्टीत अनेकजण फिरण्याचा प्लान आखत असतात. आताही जे लोक फिरण्याचा प्लान आखत असतील त्यांच्यासाठी मात्र हिरमोड करणारी बातमी आहे. कारण एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या दिवसात एसटीचे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. तब्बल १० टक्के प्रवास भाडे वाढवण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ही भाडेवाढ २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान केली जाणार आहे. लालपरीच्या भाड्यात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com