लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील एसटी प्रवास उन्हाळी सुट्टीत महागणार आहे. एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० टक्क्यांची हंगामी दरवाढ जाहीर केली आहे. साध्या आणि जलद बससाठी ही वाढ लागू असणार आहे. यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास १०० रुपयांपर्यंत महागणार आहे. तसंच रात्रसेवा, या बस सेवेसाठी लागू राहणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार प्रौढ प्रवाशांसाठी १२ रुपये तर लहान मुलांसाठी ७ रुपयांची प्रति टप्पा वाढ करण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यानंतर गावाकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. गावाकडे जाताना अनेक जण एसटीला जास्त पसंती देतात. एसटी महामंडळाच्या नियमानुसार गर्दीच्या दिवसात हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार असतो. त्याच नियमानुसार ही भाडेवाढ करण्यात आली असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.