ST bus Short Circuit: एसटी बसमध्ये शॉर्टसर्किट; प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या, VIDEO

Panic in Raigad: एसटी बसच्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनामुळे नगरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच रायगड जिल्ह्यात धावत्या बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे प्रवाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी उड्या मारल्या.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे एसटी बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला, ज्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या बसमधून उड्या मारल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ही बस दिघी-तुरुंबाडी-म्हसळा मार्गे वडाळा येथे जात होती. बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते. प्रवास सुरू असताना अचानक बसच्या कॅबिनमधून धूर निघू लागला. ही घटना पाहताच प्रवाशांनी घाबरून बसमधून उड्या मारल्या.

या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरात वारंवार एसटी बसच्या अशा घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील जुन्या आणि जीर्ण बसगाड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. आता तरी सरकार याची दखल घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com