Sangola Video: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट! सांगोल्यात तुफान राडा, नेमकं काय घडलं?

Sangola News Today: शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले.

सोलापूर : सांगोला तालुक्यातील महूद येथे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं सांगितलं जातंय. यात शेतकरी कामगार पक्षाचे शंकर पाटील यांच्यासह चार ते पाच तर तर शिवसेनेचे तीन ते चार कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. दोन्ही गटांनी दगड आणि काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले. सांगोला तालुक्यामध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात दोन्ही पक्षांमध्ये आता टोकाचा संघर्ष उभा राहिलाय. या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com