सोलापूर एसटी बस आगारात शिवशाही बस पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात व्यक्तींकडून बस डेपोतील एसटी बस जाळण्यात आली आहे. यात बसचा केवळ सांगाडा उरला आहे. मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास बस पेटवून देण्याची ही घटना घडली.
सोमवारी सकाळपासून परभणीतील घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात देखील याचे पडसाद बघायला मिळाले. तुळजापूर आगाराच्या बसवर आणि सोलापूर-सातारा या बसवर काही अज्ञात तरुणांनी कारंबा नाका परिसरातील त्या रोडवर दगडफेक केली होती. या घटनेतील आरोपींचा तपास सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास सोलापुरात अज्ञात व्यक्तींकडून बस डेपोतील एक एसटी जाळण्याचा प्रकार घडला आहे. आगारातील शिवशाही बस पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून शहर आणि परिसरात पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.