Flying Squirrels Video : सिंधुदुर्गात दुर्मिळ उडणाऱ्या खारीचं दर्शन; नेमकी हवेत उडते कशी? पाहा व्हिडिओ

Flying Squirrels Video News : सिंधुदुर्गात दुर्मिळ उडणाऱ्या खारीचं दर्शन झालंय. ही खार हवेत उडते. या खारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाहा उडणाऱ्या खारीचा व्हिडिओ

विनायक वंजारे, साम टीव्ही

सह्याद्री पट्ट्यातील दोडामार्ग वानोशी गावातील जंगलात उडणाऱ्या खारीच दर्शन झालं आहे. ही दुर्मीळ प्रजाती आहे. विदर्भातील काही अभयारण्यात ही प्रजाती आढळते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मध्ये ही उडणारी खार आढळून आल्यामुळे प्राणी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच ठरलीये. जंगल सफारीच्या वेळी डॉक्टर श्रीकृष्ण मगदूम यांना ही उडणारी खार आढळून आलीये. या खारीला इंडियन जाईंट फ्लाईंग स्क्वीरल (Indian giant flying Squirrel ) म्हणून ओळखल जातं. या खारीचा अधीवास घनदाट जंगलात असतो. ती एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जाताना हवेत सुर मारते. याच वेळी तिच्या त्वचेचा पडता उघडतो आणि ती हवेवर तरंगते. त्यामुळे तिला उडणारी खार म्हणून ओळखले जाते. ही खार दोडामार्ग तालुक्यातील वानोशी गावात आढळून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com