धक्कादायक! पुण्यात मतदानानंतर शाई पुसण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिला 'प्रसाद' |VIDEO

Attempt To Remove Voting Ink After Polling In Pune: पुण्यात मतदानानंतर शाई पुसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस मतदानाच्या संशयावरून राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.

राज्यात आज महापालिकेसाठी मतदान पार पडत आहे. अशातच पुणेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रभाग क्रमांक 33, 34 आणि 35 मधील अनेक केंद्रावर मतदानाची शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

प्रभाग क्रमांक 34 मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होती. या ठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला. बोगस मतदानासाठी हा प्रकार केला जात असल्याचा संशय आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडले. तेव्हा भाजपचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आली आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com