VIDEO : आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल; पत्रकार परिषदेतून शिंदे सरकारवर डागले टीकास्त्र
आत्ताच महायुतीने रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे. मात्र हे त्यांचं डिपोर्ट कार्ड आहे. कारण महायुती सरकारच्या काळात अनेक गोष्टी गुजरातला पाठवल्या गेल्या आहेत. रोजगार, उद्योग, कंपन्या सगळं काही गुजरातला हलवलं गेलं आहे. असा आरोप उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला आहे.
आज महायुतीकडून अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रकाशित करण्यात आला आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजना, टोल माफी असे निर्णय घेतले. प्रत्येक बैठकीत जनतेला काही देतोय असं दाखवलं गेलं आहे. मात्र या सगळ्याचा आडोसा घेऊन भयानक गोष्टी महायुतीने केल्या आहेत. अदाणी सरकारला धारावी पुनर्विकास प्रकल्प दिल्यानंतर अनेक सवलती दिल्या तसेच फुकट जमीन देखील दिल्या. मुलुंड देवनार मढ अशा अनेक जमिनी दिल्या. 1080 एकर एकूण जमिनी दिल्या अडाणी समूहाला दिल्या. मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाही, गुजरातला नेऊ शकत नाहीत म्हणून भूखंड वाटायचे असं काम् या सरकारने केलं आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.