VIDEO : मागाठाण्यात राजकीय राडा, शिंदे - ठाकरे गट आले आमनेसामने

Shivsena UBT - Shinde Group : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज मुंबईच्या मागाठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने राडा झालेला दिसला.

मागाठाने विधानसभेत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची लगबग पहायला मिळत आहे. मात्र मुंबईच्या मागाठाने विधानसभेत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांकडून या ठिकाणी वेळीच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर करण्यात आल्याने पुढचा अनर्थ टळला.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com