Ramdas Kadam : रामदास कदम यांचा शरद पवार आणि मविआवर हल्लाबोल; पाहा Video

Ramdas Kadam Critisized Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मतभेदांमुळे फुटेल असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी ही मतभेदांमुळे फुटेल. शरद पवार ठाकरे गट आणि कॉंग्रेसला संपवतील असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर वारप्रतिवार केले जात आहे. त्यातच आता महायुतीतील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शरद पवार आणि महाआघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाने त्यांच्यात येत्या दोन तीन दिवसांतच फुट पडेल, असा दावा कदम यांनी केला आहे. तर ठाकरे गट आणि कॉंग्रेसला शरद पवार संपवतील असंही त्यांनी म्हंटलं आहे. शरद पवार यांना पूर्ण देश ओळखतो, ते ठाकरे आणि कॉंग्रेसला संपवतील असा मोठा दावा रामदास कदम यांनी केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com