ShindeSena News : शिंदेसेनेच्या 60 उमेदवारांच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब; पाहा कधी जाहीर होणार यादी | VIDEO

Assembly Election Latest News : विधानसभेच्या अनुषंगाने शिंदेसेनेची 60 उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीत शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी अंतिम झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 60 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून आजच ही यादी जाहीर केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 60 उमेडवरणक्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून महायुतीची विधानसभा निवडणुकीची सगळी तयारी झालेली असल्याचं या निमित्ताने बघायला मिळत आहे. एकीकडे काल भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर आज शिवसेना शिंदे गट आपली 60 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. आज संध्याकाळीच ही यादी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात कोणाकोणाला संधि मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com