शिर्डी साईबाबा संस्थानाची अतिवृष्टीसाठी ५ कोटींची मदत; न्यायालयाची ‘गुप्त’ परवानगीही आवश्यक, कारण? VIDEO

Sai Baba Sansthan Emergency Flood: शिर्डी साईबाबा संस्थान राज्यातील अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांसाठी एकूण ५ कोटी रुपये मदत जाहीर केली आहे.

शिर्डी: राज्यातील अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी साईबाबा संस्थानाने एक मोठे सामाजिक पाऊल उचलले आहे. संस्थानकडून या संकटातून सावरण्यासाठी एकूण ५ कोटी रुपये मदतीसाठी जाहीर करण्यात आले आहेत.

यापूर्वी संस्थानकडून १ कोटी रुपये मदतीसाठी दिले गेले होते. आता त्यात अतिरिक्त ४ कोटी रुपये निधी जोडण्याचा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. या मदतीचा उपयोग प्रत्यक्षात अतिवृष्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी व आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ५० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चासाठी संस्थानाला उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, त्यामुळे हा प्रस्ताव न्यायालयाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

साईबाबा संस्थानाच्या या सामाजिक उपक्रमामुळे पुन्हा एकदा देशातील व राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची प्रतिमा उभी राहिली आहे. या मदतीद्वारे शिर्डीचे साईबाबा संस्थान आपत्तीग्रस्तांची मदत करण्याच्या उद्देशाला प्रत्यक्ष रूप देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com