शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला 24 तासांचा अल्टीमेटम, ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये वादंग|VIDEO

Pratap Sarnaik 24 Hour Ultimatum To BJP: मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीतील तणाव वाढला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला २४ तासांचा अल्टीमेटम देत स्वतंत्र निर्णयाचा इशारा दिला आहे.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा अधिकच वाढला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला थेट २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युतीसाठी काही अटी मांडल्या होत्या. त्यामध्ये ‘शिवार गार्डन’ परत देणे आणि भाजपाचे जे कार्यकर्ते शिवसेनेत घेतले गेले आहेत, ते परत करणे या प्रमुख अटींचा समावेश होता.

या संदर्भात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवार गार्डन ज्या वेळी देण्यात आले होते, त्या कागदपत्रांवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याच सह्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर गैरसमज पसरवला जात आहे. भाजपाने मांडलेल्या अटी मान्य करण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com