Maratha Reservation News : शिंदे-फडणवीस करणार तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, हैद्राबाद गॅझेटबाबत होणार चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ऑनलाईन ही चर्चा होणार आहे.

मुंबईः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. हैद्राबाद गॅझेटबाबत (Hydrabad Gazette) चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केलं होतं. पण सरकारने त्यांच्याकडे एक महिन्यांची मुदत मागितली होती. आता सरकारने याबाबत तेलंगणा सरकारशी संपर्क साधला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी सरकार संवाद साधेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com