विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? ठाकरेंचा दारूण पराभव, धक्कादायक निकाल आले समोर

Maharashtra MLC election results : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी काही मतदारसंघांत विजय मिळवला आहे. किरण सरनाईक आणि कौस्तुभ गावडे विजयी झाले असून नागपूरमध्ये सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत.

महायुतीची जोरदार मुसंडी; कोण आघाडीवर आणि कोण विजयी?

MLC Election Results 2026 : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंना मात्र जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दोन जागांवर विजयाकडे वाटचाल केली आहे. ५ मतदारसंघांमधून हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून काही ठिकाणी विजयही निश्चित झाला आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीने मुसंडी मारलीय. अमरावतीतून शिंदेसेनेचे किरण सरनाईक आणि पुण्यातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. तर नागपूरमधून सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. पुणे पदवीधरमधून मविआच्या हर्षदा देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाचे प्रतापसिंह पाटीलही पुढे आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या या निकालांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com