Nilesh Lanke Video : 'शरद पवारांच्या नादी लागू नका, अन्यथा...'; राम शिंदेंच्या बालेकिल्यात खासदार लंकेंचा इशारा

Nilesh Lanke News : शरद पवारांच्या नादी लागू नका, अन्यथा राजकीय नुकसान करून घ्याल, अशा शब्दात शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता आमदार राम शिंदेंना इशारा दिला.

अहमदनगर : राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या नादी लागू नका, अन्यथा राजकीय नुकसान करून घ्याल, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी भाजप आमदार राम शिंदे यांना दिला आहे.

'कर्जत जामखेडमध्ये शरद पवारांच्या नादी लागणे कोणाच्या डोक्यात असेल, त्यांना हात जोडून सांगतो, त्यांना पवारांचा नाद करू नका. अन्यथा राजकीय नुकसान होईल, असं खासदार लंकेंनी म्हटलं.

नेमकं काय म्हटलं?

'पवार इज पॉवर अँड पवार इज पॉवर. माझ्या बराच वेळचा डायलॉग आहे. सगळ्यांचा नाद करा, मी सर्वांना सांगतो. त्यांनाही सांगतो. लांब असेल तर मेसेज पास केला तर बरं होईल. सगळ्यांचं नाद करा, पण शरद पवारांचा नाद करू नका', असे लंके म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com