Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

Political War of Words: नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने ‘देवा तूच सांग’ या बॅनर मोहिमेतून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवरून ही जाहिरात चर्चा रंगवत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आज नाशिकमध्ये शिबिर पार पडत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे पडघम कधीही वाजू शकता या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष शिबिर, मोर्चा, आंदोलने करून शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील तयारीला सुरुवात केलीय. या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे.

मात्र, या शिबिराची जाहिरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. 'देवा तूच सांग' या बॅनरने आणि अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील जाहिरातीने राज्यात चर्चेला उधाण आलेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी 'देवाभाऊ' असे कॅम्पेन राबवण्यात आले होते. त्यालाच राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले असल्याचे म्हटलं जात आहे. प्रत्येक दैनिकांच्या पहिल्या पानावरील या जाहिरातीने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. या जाहिरातीत शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टीचे संकट, नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव, इतर योजना, महिला सुरक्षा आणि बेरीजगारी अशा प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे. तर उद्या नाशिकमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com