महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची चर्चा आहे. तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पवार कुटुंब एकत्र आले तर आनंद होईल अशी भावना व्यक्त केली होती. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे. यामुळे प्रत्येक पक्ष हा रणनीती आखताना दिसत आहे. या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चाना उधण आले आहे.याच दरम्यान आज शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले आहे.
त्याच निमित होते ते म्हणजे वसंतदादा पाटील शुगर इंस्टीट्यूट या कारखण्यासंदर्भातील बैठक. साखर उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबत आज शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे. तब्बल दोन तास ही बैठक चालली आहे. या संदर्भात एक पायलेट प्रोजेक्ट करन्यात येणार आहे.
बारामतीतील सोमेश्वर कारखाना, बारामती बँक आणि AI सस्था यांच्या माध्यमातून एक पायलेट प्रोजेक्ट करण्यात येणार आहे.
ऊस उत्पादनात ४० टक्के प्रोडक्शन वाढले तरच AI ला पैसे दिले जातील असं बैठकीत चर्चा झालीय. या बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील यांच्यासह AI चे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.