
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना पवारांचा बालेकिल्ला... मात्र या कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय.. अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात एण्ट्री केलीय... अजित पवारांनी ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीत चुरस आणलीय.. मात्र त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात....
- माळेगाव साखर कारखाना पवारांचा गड
- 1997 आणि 2015 मध्ये राष्ट्रवादीचा पराभव
- कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात पॅनल
- स्वतः उमेदवारी दाखल करुन निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न
- भाजपच्या चंद्रराव तावरेंची विरोधकांना मदत होण्याची शक्यता
बारामतीवर वर्चस्वाचा मार्ग माळेगाव सहकारी साखर कारखान्यातून जातो, असं म्हटलं जातं.. त्यातच हा कारखाना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मानला जातो.. त्यातच पवारांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरेंसोबत पवारांनी जुळवून घेतलंय.. एवढंच नाही तर अजित पवारांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या सभेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही इशारा दिलाय....
बारामती विधानसभा जिंकल्यानंतर अजित पवारांनी आपलं लक्ष्य आजूबाजूची तटबंदी मजबूत करण्याकडे वळवलंय.. आधी इंदापूरचा सहकारी साखर कारखाना आणि आता माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसलीय...त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष अजित पवारांना बालेकिल्ल्यात पराभवाची धूळ चारण्यासाठी भाजप रंजन तावरे आणि चंद्रराव तावरेंना ताकद देतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत अजित पवारांना यश मिळणार की भाजपच्या मदतीनं दुसरं पॅनल वरचढ ठरणार? याकडे लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.