Maharashtra Politics: शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर...,शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजपला सज्जड दम? VIDEO

Shambhuraj Desai Warns BJP Over Harassment: साताऱ्यातील मेढा येथील मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सज्जड दम दिला. शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

साताऱ्यातील जावळीत शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही. शिवसेनेचा मानसन्मान राखला गेलाच पाहिजे. जर महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील मेढा येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात दिला. भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जावळी मतदारसंघात शंभूराज देसाई यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीमध्येच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकी आधीच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

शिवसैनिकांनी या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महायुतीतील नेत्यांकडून अडचणीत आणलं जातं त्यांना दमबाजी केली जाते. खोटे गुन्हे दाखल केले जातात अशी व्यथा मांडल्याने पालकमंत्री प्रथमच या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आणि त्यांनी आपल्या आक्रमक शैलीतून शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारीला लागा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून मी आहे असा विश्वास दिला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com