Amit Shaha : 'सरकार आपलंच येणार, पण..'; मध्यरात्रीच्या भेटीत शिंदेंची अमित शहांना मागणी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यात अनेक गाठीभेटी आणि बैठक ते घेत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा सह्याद्री अतिथिगृहावर एक बैठक पार पडली आहे. यात राज्यात महायुतीचच सरकार आणू अशी ग्वाही शिंदे यांनी अमित शहा यांना दिली आहे. तर जागावाटपात उशीर नको अशी विनंती देखील शिंदे यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

रात्री उशिरा सह्याद्री अतिथी गृहामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करायला नको, जागावाटप लवकरच जाहीर करायला हवं अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजना या लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचले आहेत यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितल्याचेही समोर आलं आहे. जागावाटपाच्या विषयावर सर्व समन्वयांना मार्ग काढू अशी ग्वाही अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली. तसेच महायुतीमध्ये विसंवाद आहे अशी भावना लोकांसमोर येऊन देऊ नका, आपापसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र या आणि एकत्र लढा, असा सल्लाही अमित शहा यांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com