Satish Bhosale: खोक्याला अजून अटक का नाही? मुंनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर, नेमके काय म्हणाले? VIDEO

Sudhir Mungantiwar Slams Own Government : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या अजूनही पोलिसांना चकमा देत फिरतोय. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना सुधीर मुंनगंटीवारांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्याने ढाकणे कुटुंबियाला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर खोक्याचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर झपाट्याने पसरू लागले. त्यानंतर अचानक बीड पोलीस हे अचानक जागे झाले आणि त्याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले.

खोक्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये मोर्चा काढून त्याच्यासह सुरेश धस यांना देखील सहआरोपी करा अशी मागणी जोर धरू लागली. खोक्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहे. मात्र अजूनही तो पोलिसांच्या ताब्यात सापडला नाहीये. यावरूनच भाजपचे नेते सुधीर मुंनगंटीवारांनी आपल्याच सरकारला काही प्रश्न विचारून थेट घरचा आहेर दिला आहे. मुंनगंटीवार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माणच होईलना जर पत्रकारांना मुलाखत द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशांचा पी मोठा हा विचार तर केला पाहिजे ना असे खडेबोल सुनावून मुंनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com