Washim News: सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांवर पैसे उधळले; घरकूल हफ्त्यांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप|VIDEO

Cash shower protest in government office: वाशिमच्या मालेगाव पंचायत समिती कार्यालयात ब्राह्मणवाड्याचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर पैसे उधळले आहे.

ग्रामस्थांना घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते न मिळाल्याच्या निषेधार्थ वाशिमच्या मालेगाव पंचायत समिती कार्यालयात चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला. ब्राह्मणवाडा गावचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या अंगावर ५० आणि १०० रुपयांच्या नोटा उधळून आपला तीव्र संताप व्यक्त केला.

सरपंच नागरे यांनी सांगितले की, घरकुल योजनेचे हप्ते मिळण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समितीला भेटी दिल्या. मात्र प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. माहिती विचारली असता अप्रत्यक्षरित्या पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकाराच्या निषेधार्थ त्यांनी थेट नोटा उधळून आंदोलनात्मक कृती केली.

या प्रकारामुळे संपूर्ण पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली असून, उपस्थित कर्मचारी आणि अधिकारीही या प्रकाराने काही क्षण गोंधळून गेले. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी या घटनेने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com