Bogus Cotton Seeds : बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट; डमी ग्राहक बनून कृषि अधिकाऱ्यांनी केली कारवाई

Dhule News : बोगस बियाणे विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार मुंबई- आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्यावर डमी ग्राहक बनून बियाणे व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाने कारवाई केली
Bogus Cotton Seeds
Bogus Cotton SeedsSaam tv
Published On

धुळे : पावसाळा जवळ येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आता शेती कामाची लगबग सुरू झाली आहे. मार्केटमध्ये बियाणे देखील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अशातच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट देखील सुरू झाला असल्याचे उघड झाले आहे. धुळ्यात बोगस बियाणे विक्री करणार्याचा पर्दाफाश केला असून कृषी अधिकारी डमी ग्राहक बनून कापसाचे बोगस बियाणे जप्त केले आहे. 

खरीप हंगाम आता तोंडावर आहे. यामुळे शेती कामांना वेग आला असून शेतकऱ्यांची देखील आता शेती तयार करणे आणि बियाणे खरेदीची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान बागायतदार शेतकरी मान्सून पूर्व कापसाची लागवड करत असल्याने बियाणे खरेदी करू लागले आहे. मात्र कापसाचे प्रतिबंधित असलेल्या बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. अशाच प्रकारे काल नंदुरबार जिल्ह्यात ३ लाखाचे बोगस बियाणे जप्त करण्यात आल्यानंतर आज धुळे जिल्ह्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. 

Bogus Cotton Seeds
Bogus Cotton Seeds : नंदुरबारमध्ये ३ लाखांचे बोगस बियाणे जप्त; खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई

बोगस बियाणे विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर डमी ग्राहक बनून बियाणे व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाने कारवाई केली आहे. चार कापूस वाणाच्या बियाणेची बेकायदेशीर विक्री करून तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संशयीतास ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

Bogus Cotton Seeds
Cyber Crime : ऑनलाईन ट्रेडींगच्या नावे शिक्षकाला गंडविले; साडेसात लाख रुपयात फसवणूक

१८१ बियाणांचे पाकीट जप्त 

दरम्यान कारवाईत संबंधितांच्या ताब्यातून १ लाख ३३ हजार ४५० किमतीचे १८१ पॉकेट जप्त करण्यात आले आहेत. संशयीत सुर्यकांत बन्सीलाल गुजर उर्फ पंकज पटेल (रा भरवाडे, ता. शिरपुर) यास ताब्यात घेण्यात आले आहे, याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण व बियाणे निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com