Santosh Ladda: दरोड्यातील सोनं विकून घेतला प्लॉट; संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नवा ट्वीस्ट|VIDEO

Rohini Khotkar Role In Santosh Ladda Robbery: संतोष लड्डा दरोडा प्रकरणात अँकाऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक केली असिऊं तिने लपवलेले चांदी, तुळशी वृंदावनात लपवलेले सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काऊंटर केलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक केल्यानंतर तिचेही अनेक कारणाने पुढे येऊ लागले आहेत. तिने लपवलेले चांदी त्यानंतर तुळशी वृंदावनामध्ये ठेवलेले सोने पोलिसांना मिळाले. त्यानंतर दरोड्यातून लुटलेल्या सोन्याची विक्री करून प्लॉटही खरेदी केल्याच्या समोर आले आहे.

ज्यांचा प्लॉट खरेदी केला होता त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ लाख रुपये हस्तगत केले आहेत. दरोडा टाकल्यानंतर मिळालेले सोने विकून नऊ लाख रुपये रोख रक्कम प्लॉट घेण्यासाठी रोहिणी खोतकरने जमीन मालकाला पैसे दिले होते. अमोल खोतकरचा एन्काऊंटर केल्यानंतर तिला जणू काहीच माहित नाही असं रोहिणी बोलत होती. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर रोहिणी खोतकरणे चांदी सोने आणि रकमेची एकेक माहिती द्यायला सुरू केली आहे. त्यामुळे साडेपाच किलो सोन्याचा हिशोब लागेल अशी पोलिसांना शक्यता वाटते आहे. सध्या तिची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com