Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराडच कर्ता करविता, धसांची प्रतिक्रिया | VIDEO

Walmik Karad News : वाल्मिक कराड हा करता करविता आहे, असं सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल आरोपपत्रात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळं कराडभोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. यावर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड हाच सगळ्याचा करता आणि करविता आहे, असं सुरेश धस म्हणाले.

या गँगचा आणि सगळ्यांचा प्रमुख हा वाल्मिक कराडच आहे. करता आणि करविता, मारणारा आणि धमकी देणाराही तोच आहे. संतोष देशमुख यांचं काय चुकलं होतं? इतकं निर्घृणपणे आणि निष्ठुरपणे मारलं. एसआयटीने अगदी योग्य रितीने आरोपपत्र दाखल केलं आहे, असं सुरेश धस म्हणाले.

वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार

आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर २ असा उल्लेख करण्यात आला आहे.

२९ नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली होती.

६ डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद

हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटीच्या घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com