Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

पुण्याच्या राहुल गांधींच्या सभेत एक अजब गजब प्रकार घडलाय. राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच पोलिसांकडून नो एन्ट्री दिलीये. महाविकास आघाडीची सभा असताना उमेदवार संजोग वाघेरे ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते.

Rahul Gandhi Pune | पुण्याच्या राहुल गांधींच्या सभेत एक अजब गजब प्रकार घडलाय. राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच पोलिसांकडून नो एन्ट्री दिलीये. महाविकास आघाडीची सभा असताना उमेदवार संजोग वाघेरे ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते. मात्र राहुल गांधी आल्यानंतर संजोग वाघेरे यांना पोलिसांकडून आतमध्ये सोडण्यास मनाई करण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला. या दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुद्धा झाली. विशेष म्हणजे राहुल गांधींची सभा संपेपर्यंत संजोग वाघेरे यांना स्टेजवर सोडलेच नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com