जागा तुझी, दिवस तुझा..संजय गायकवाडांचा जलील यांच्यासोबत स्टॅम्प पेपरवर करार | VIDEO

Political Fight Agreement: आमदार संजय गायकवाड आणि माजी खासदार इम्तीयाज जलील यांच्यातील वाद आता थेट लढाईवर पोहोचला आहे. स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार केला असून, कोणतेही शस्त्र न वापरता दोघेही एकमेकांना भिडणार असल्याचं ठरलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कँटिनमध्ये शिळे वरण मिळाल्याने तेथील एका कामगाराला लाथ बुक्यांनी मारहाण केली होती. यानंतर माजी खासदार इम्तीयाज जलील यांनी जर मी कँटिन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगलीच अद्दल घडवली असते अशी टीका केली होती. त्यानंतर संजय गायकवाड यांनी पलटवार करत कँटिन मालक जरी जलील असते तर त्यांनाही चोपले असते असे वक्तव्य केले होते.

जगह तेरी, दिन तेरा, वक्त तेरा आजा कहा लढना हे असे प्रति आव्हान दिले होते. हेच आव्हान संजय गायकवाड यांनी स्वीकारत थेट स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला आहे. त्यात त्यांनी जलील आणि माझ्यात लढाई होईल. यामध्ये दगड धोंडे, आणि इतर शस्त्रांचा वापर होणार नाही अशी हमी देखील गायकवाड यांनी लिहून घेतली आहे. बरेवाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com