Sangli News: आधी पाठलाग, नंतर धारदार शस्त्रानं वार करत...; सांगलीत 'त्या' भाजी विक्रेत्या तरुणासोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Murder Shocks Sangli: सांगली शहरामध्ये दिवागणिक गुन्हेगारी वाढताना दिसत आहे, अशातच आज एका भाजीवाल्याचा खून करण्यात आला आहे. यामुळे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे.शहरातल्या शंभरफुटी रोडवर पाठलाग करत धारदार शस्त्राने महेश कांबळे,या तरुणाचा खून करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास ही हत्या झाली आहे.शंभर फुटी रोड पहाटेच्या सुमारास भाज्यांचा लिलाव पार पडतो,त्या निमित्ताने महेश हा आला असता,दोघा अज्ञातांनी कोयता व दगडांनी महेश कांबळे याच्यावर हल्ला करत हा खून केला आहे.महेश कांबळे हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता,तसेच तो एका खुनातील आरोपी देखील होता,मात्र त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही,पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com