Sandipan Bhumre: फक्त ६ सेकंदांत संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर साडेआठ एकर जमीन; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Land Scam Involving Sandipan Bhumre Driver: संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर ६ सेकंदात साडेआठ एकर जमीन लिहून देण्याचा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे. हे प्रकरण तब्बल ५०० कोटींच्या घोटाळ्याचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बोगस नवाबाला हाताशी धरून खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाहीतर कोट्यवधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. पाचशे रुपयांच्या बॉण्डवर हीबानामा करून सिटी सर्व्हे कार्यालयात पीआर कार्ड करताना अधिकाऱ्यांना हाताशी धरले. रातोरात या जमिनी ड्रायव्हर जावेदच्या नावावर करून घेतल्या. इतकंच नाही तर रजिस्ट्री न करता ६ कोटी १८ रुपयाचे सरकारचे नुकसान झाले आहे. प्रक्रियेमध्ये सरकारी अधिकारी, मोठे नेते आणि पोलिसांचा सहभाग आहे, असा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

प्रकरण नेमके काय आहे?

खासदार संदीपान भूमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर साडेआठ एकर जागा घेतली आहे.

४ लाख ३३ हजार ३२५ स्क्वेअर

३६ हजार १९० रुपये रेडी रेकनरचा दर आहे.

१२३ कोटींची सरकारी दरानुसार किंमत आहे.

सध्या बाजारातील मूल्य हे ५०० कोटी पेक्षा जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com