Sanjay Shirsat: तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ"; संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात|VIDEO

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat Video: संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली. पैसे कुठून आले? असा थेट सवाल करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शांततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मंत्री संजय शिरसाठ यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यामध्ये शिरसाठ हे एका रूममध्ये बसले आहे आणि त्यांच्या हातात सिगारेट आहे. तसेच त्या व्हिडिओमध्ये पैशाची बॅग देखील असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावरच आता संभाजीनरचे माजी खासदार इम्तीयाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला काही आश्चर्य वाटले नाही. कोट्यवधीची प्रॉपर्टी घेण्यासाठी पैसे कुठून आले, आज मला दिसले की पैसे बेडरूममधून आले हे दिसले. प्रश्न हा आहे की हे पैसे आले कुठून?

पण काहीही होत नाही. सरकार म्हणत असेल की तुम्हीही खा आम्हीही खातो.

घरका भेदी कोण आहे याचा शोध घेण्याचे काम हे शिरसाट आहे तर हा पैसे कुठून आला हे तपासण्याचे काम तपास यंत्रणांचे आहे.

माझ्या तक्रारीची खूप लाईटली दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह येऊ लागले आहे. इतके भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन शांत का बसत आहेत असा प्रश्न लोक विचारत आहेत. आता लोक एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारात नाहीत. तर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत आहेत की तुम्ही शांत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com