Saam Tv Exit Poll: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपला किती जागा मिळणार? पाहा एक्झिट पोल

Kalyan- Dombivli Municipal Corporation: कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिंदेसेनेला मोठा यश मिळण्याची शक्यता आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदेगट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडला. या महानगर पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. या निवडवणुकीवेळी भाजप आणि शिंदेसेनेत अनेक राडे देखील झाले. या महापालिकेवर कुणाची सत्ता येणार याकेड सर्वाचे लक्ष लागले आहेत. अशात साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

साम टीव्हीच्या महा एक्झिट पोलनुसार, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत भाजपने देखील चांगली मुसंदी मारली आहे. भाजप ४२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे ६ जागांवर, काँग्रेस २ जागांवर, शिवसेना ठाकरे गट २ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस गट २ जागांवर, वंचित बहुजन आघाडी २ जागांवर आणि इतर ६ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com