Pune News: पुण्यातील सैराट प्रकरणात मोठा ट्विस्ट! प्रेम की फसवणूक? वाचा संपूर्ण प्रकरण

New Twist in Viral Khed Elopement: खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाहामुळे गाजलेलं सैराटसदृश प्रकरण आता वेगळं वळण घेत आहे.
Summary
  • प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला, पण त्याला विरोध झाला.

  • तिच्या कुटुंबियांनी तिला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

  • विश्वनाथवर आधीच्या लग्नाचे आणि अंधश्रद्धेचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

  • पोलिस तपास सुरू असून, प्रकरण अनेक वळणं घेत आहे.

काल पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खरपुडी गाव संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलं. कारण होतं विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह. मात्र हा विवाह काहींना मान्य नव्हता, आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराटसदृश घटना. पण आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. खरपुडी गावातील प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला. पण प्राजक्ताच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता.

त्यामुळेच तिच्या आई, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला मारहाण करत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार घडला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सैराटसारखी कथा खऱ्या आयुष्यात घडल्याचं चित्र निर्माण झालं. ही घटना गंभीर बनली आणि खेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला. संध्याकाळपर्यंत प्राजक्ताच्या वडील, आई आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आले.

प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत, माझ्या आई-वडिलांना आणि पतीला काहीही त्रास होऊ नये, असं सांगितलं. तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे काशीद कुटुंबियांनी विश्वनाथ गोसावीबद्दल गंभीर आरोप केले आहेत.

विश्वनाथ याचं आधीचं लग्न झालं आहे, आणि त्यांनी हे लपवलं. तसंच त्यांच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवली जात आहे, हे सत्य बाहेर यावं. या आश्रमात ४० हून अधिक गाड्या, आलिशान खोल्या, आणि मोठी शेती असल्याची माहितीही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विश्वनाथ गोसावीचं चारित्र्य, त्याचं पूर्वीचं लग्न, आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणात सैराटसारखा काही प्रकार नाही. या प्रकरणात एक वेगळा कट रचला जातोय. पोलिसांनी घटनास्थळी दांडके शोधले नाहीत आणि मुलीचा जबाब समोर यायला हवा तर खरपुडीतील सैराटसदृश प्रकरण आता अनेक वळणं घेत आहे. मुलीच्या जबाबावर, आरोपींच्या चौकशीवर, आणि पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण अवलंबून राहिलं आहे.

खरंच... सैराट निघाला गैराट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com