Udyog Bhushan Puraskar : 'रतन टाटा भूषण पुरस्कार' !, उद्योग भूषण पुरस्काराचं नाव बदललं

Cabinet Meeting Decision : रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून त्यांना आदरांजली वाहत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्कारचं नाव बदलून रतन टाटा यांच्या नावानेच हा पुरस्कार यापुढे देण्यात येणार आहे. महाराष्ट्र उद्योग भवनाला देखील त्यांचं नाव देण्यात येणार आहे. पहिला उद्योग भूषण पुरस्कार हा रतन टाटा यांनाच मिळालेला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना त्यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे. तर मुंबईत उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनाला देखील रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या उद्योग भूषण पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले होते, त्या पुरस्काराचे नाव बदलून आता हा पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अत्यंत महत्वाचा निर्णय ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी पद्मविभूषण रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची भारत सरकारला विनंती करणारा एक प्रस्तावही संमत करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com